हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना तेथे अशा प्रकारे मोकळ्या जागेवर अवैधरित्या नमाजपठण होणे आणि ते रोखण्यासाठी हिंदु महिलांना आंदोलन करावे लागणे
हे हिंदूंना अपेक्षित नाही ! हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनाही कळले कसे नाही ?
‘गुरुग्राम (हरियाणा) येथील ‘सेक्टर ४७’ येथे वास्तव्य करणार्या हिंदु महिलांनी मोकळ्या जागेत अवैधरित्या चालू असलेल्या नमाजपठणाला विरोध करण्यासाठी भजन-कीर्तन आणि आरती केली. हिंदु महिलांनी अवैधरित्या चालू असलेल्या नमाजपठणाच्या निषेधार्थ हातात फलक पकडून निदर्शने केली. याच वेळी पोलिसांच्या कडक सुरक्षेत नमाजपठणही करण्यात आले.’