साहेबगंज (झारखंड) येथील मुसलमानबहुल भागात श्री कालीमातेच्या मिरवणुकीवर दगडफेक
|
साहेबगंज (झारखंड) – येथे धर्मांध मुसलमानांनी २८ ऑक्टोबर दिवशी श्री कालीमातेच्या मिरवणुकीवर दगडफेक केली. यात महिलांसह काही जण गंभीररित्या घायाळ झाले. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार करत स्थितीवर नियंत्रण मिळवले. येथे आता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ही मिरवणूक मुसलमानबहुल भागातून जात असतांना ही घटना घडली. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. येथील मुसलमानांच्या घरांच्या छतावरून ही दगडफेक करण्यात आली. दळणवळण बंदीच्या पूर्वीही येथे मिरवणुकीच्या वेळी दगडफेक झाली होती. (जर पूर्वी येथे अशी घटना घडली होती, तर पोलिसांनी या वेळी खबरदारी घेऊन ती पुन्हा होऊ नये, यासाठी प्रयत्न का केले नाहीत ? याची चौकशी होऊन हलगर्जीपणा करणार्या पोलिसांवर कारवाई केली पाहिजे ! – संपादक)
Siege at Sahibgunj, Jharkhand: Stone pelting during Visarjan procession, slogans of Nara-e-Taqbeer and two completely different versions
(A comprehensive report of what transpired, by @UnSubtleDesi)https://t.co/aEKHyomghy
— OpIndia.com (@OpIndia_com) October 12, 2019
संपादकीय भूमिका
|