कासगंज (उत्तरप्रदेश) येथील न्यायालयात दोन महिला अधिवक्त्यांमध्ये हाणामारी !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशच्या कासगंज जिल्हा सत्र न्यायालयात दोन महिला अधिवक्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला. यात दोघी एकमेकींचे केस ओढत आहेत, एकमेकींना कानाखाली मारत आहेत, तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करत आहेत, असे दिसत आहे. या प्रसंगी तेथे असणारे अधिवक्ते त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत; मात्र त्या दोघीही ऐकत नसल्याचेही या व्हिडिओत दिसत आहे. त्यांच्यामध्ये कोणत्या कारणावरून वाद झाला, हे समजू शकले नाही.
सौजन्य कॅपिटल टीव्ही उत्तरप्रदेश
संपादकीय भूमिकाज्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेविषयी लोकांमध्ये धाक निर्माण करायला हवा, तेच कायद्याचे मंदिर मानल्या जाणार्या न्यायालयात अशा प्रकारचे कृत्य करत असतील, तर जनतेने कुणाकडे पहायचे ? |