जियाउद्दीनने ‘राजेश’ बनून ३ मुले असलेल्या हिंदु महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवले !
आगरा (उत्तरप्रदेश) येथे लव्ह जिहादची घटना उघडकीस
आगरा (उत्तरप्रदेश) – आगरा येथील जियाउद्दीन याने ‘राजेश’ बनून ३ हिंदु मुलांच्या आईला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी २५ ऑक्टोबरला जियाउद्दीन याला कह्यात घेतले. पीडित महिलेला नारी निकेतनमध्ये पाठवण्यात आले असून तिच्या कुटुंबियांनी याविषयी कळवण्यात आले आहे.
3 बच्चों की माँ को भगा ले गया जियाउद्दीन, ‘राजेश’ बन कर रह रहा था हिन्दू महिला के साथ: फैक्ट्री में हुई थी जान-पहचान, आधार कार्ड से खुला राज़#Uttarakhand #Agrahttps://t.co/x1ewQf4SDg
— ऑपइंडिया (@OpIndia_in) October 26, 2022
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार बरहान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बधनु गावात एक संशयित महिलेसह रहात होता. स्थानिकांना संशय आल्याने त्यांनी विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांना कळवले. विहिंपच्या कार्यकर्त्यांनी चौकशी केली असता त्यांना संशय आला. त्यांनी त्याविषयी बरहान पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी दोघांनाही कह्यात घेऊन चौकशी केली. राजेश बनून गावात रहाणारा व्यक्ती जियाउद्दीन असल्याचे चौकशीच्या वेळी उघड झाले. पोलिसांनी जियाउद्दीनला अटक केली, तर पीडित महिलेला नारी निकेतनमध्ये पाठवले. पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.