रामनाथी (गोवा) येथे झालेल्या युवा शिबिराच्या वेळी ठाणे येथील श्री. सिद्धार्थ देवघरे (वय १७ वर्षे) याला आलेल्या अनुभूती
१. ‘शिबिराच्या आरंभी शंखनाद होत असतांना शंखाच्या नादामुळे ‘माझ्या कानांवरील आवरण न्यून होत आहे’, असे जाणवले.
२. प्रार्थना केल्यावर संपूर्ण शिबिरस्थळ प्रकाशमान झाल्याचे जाणवले.
३. युवा साधकांच्या मार्गदर्शनाच्या वेळी आलेल्या अनुभूती
अ. साधक व्यासपिठावर बोलण्यासाठी आल्यानंतर काही वेळाने त्यांच्या डोक्याभोवती पांढर्या रंगाचे वलय दिसायचे.
आ. वातावरणात निर्गुणतत्त्व वाढल्याचे जाणवले. ‘भिंतीवरून भूमीपर्यंत गुलाबी आणि जांभळ्या रंगाचा पट्टा निर्माण झाला आहे’, असे दिसले.
४. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या मार्गदर्शनाच्या वेळी आलेल्या अनुभूती
अ. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्यातून चैतन्य बाहेर पडत आहे आणि त्यांच्या मस्तकाच्या मागे चक्रासारखे वलय निर्माण झाले आहे’, असे दिसले आणि वातावरणात निर्गुणतत्त्व वाढल्याचे जाणवले.
आ. एक प्रकारचा दैवी सुगंध आला.
५. संतसत्संगाच्या वेळी वातावरणात निर्गुणतत्त्व आणि प्रीतीची स्पंदने अधिक प्रमाणात वाढल्याचे जाणवणे
संतांचा सत्संग लाभल्यावर माझा भाव जागृत झाला. त्या वेळी वातावरणात निर्गुणतत्त्व आणि प्रीतीची स्पंदने अधिक प्रमाणात वाढल्याचे जाणवले. संतांच्या पूर्ण देहाभोवती पिवळ्या प्रकाशाचे वलय दिसले.’
– श्री. सिद्धार्थ देवघरे (वय १७ वर्षे), ठाणे (१४.११.२०२१)
|