माजी आमदार विनायक निम्हण यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने पुणे येथे निधन !
पुणे – येथील माजी आमदार आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विनायक निम्हण यांचे २६ ऑक्टोबर या दिवशी दुपारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. मृत्यूसमयी ते ६० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा माजी नगरसेवक सनी निम्हण, सून, नातवंडे असा परिवार आहे. निम्हण हे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे १५ वर्षे आमदार होते. निम्हण यांनी शिवसेनेच्या तिकिटावर दोन वेळा, तर काँग्रेसकडून एकदा विधानसभेची निवडणूक जिंकली होती. ते सध्या शिवसेनेत होते; मात्र गेल्या काही वर्षांपासून सक्रीय राजकारणापासून ते दूर होते.