प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांच्याकडे आली टि्वटरची मालकी !
मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल यांच्यासह तिघांची हकालपट्टी
नवी देहली – प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांनी टि्वटर आस्थापनावर मालकी अधिकार मिळवला आहे. यानंतर त्यांनी लगेचच मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल, कायदा विभागाचे प्रमुख विजया गड्डे आणि मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेगल या वरिष्ठ अधिकार्यांची हकालपट्टी केली आहे. यासह काही कर्मचार्यांनाही कामावरून काढून टाकण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.
Dear Twitter Advertisers pic.twitter.com/GMwHmInPAS
— Elon Musk (@elonmusk) October 27, 2022
इलॉन मस्क यांनी ट्वीट करून सांगितले की, भविष्यातील नागरिकांसाठी एक डिजिटल चौक असणे आवश्यक आहे, त्यामुळेच मी ट्विटर खरेदी केले आहे. याठिकाणी विविध विचारसरणीचे लोक हिंसा टाळून वादविवाद करू शकतील. सध्या समाजमाध्यमे अतीउजवे आणि अतीडावे यांत विभागली जाण्याची भीती आहे. त्यामुळे तिरस्कार आणि समाजातील दरी वाढत जाईल.