रद्दी आणि भंगार विकून केंद्र सरकारला मिळाले २५४ कोटी रुपये !
भंगार विकल्यामुळे मोठ्या प्रमाणात जागा झाली रिकामी !
नवी देहली – केंद्र सरकारने गेल्या ३ आठवड्यांमध्ये देशभरातील सरकारी कार्यालयांमधून रद्दी आणि भंगार विकून तब्बल २५४ कोटी २१ लाख रुपये मिळवले. या गोष्टी विकल्यामुळे मोठ्या प्रमाणात जागा रिकामी झाली आहे. सरकारी कार्यालयांमधील ३७ लाख स्वेअर फूट जागा यामुळे रिकामी झाली आहे. २ ऑक्टोबरपासून ही विशेष स्वच्छता मोहीम चालू करण्यात आली आहे. यामध्ये ६७ सहस्र कार्यालयांचा समावेश आहे. यापूर्वी अशा प्रकारची मोहीम मागील वर्षी राबवण्यात आली होती, त्या वेळी त्यातून सरकारला ६२ कोटी रुपये मिळाले होते.
Centre earns over Rs 250cr by disposing off scrap on office premises https://t.co/PYYsmeztet
— TOI India (@TOIIndiaNews) October 25, 2022
संपादकीय भूमिकासरकारी कार्यालयांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात रद्दी आणि भंगार जमा होईपर्यंत प्रशासकीय अधिकारी झोपले होते का ? सातत्याने रद्दी आणि भंगार विकण्याची प्रक्रिया का राबवली जात नाही ? रद्दी आणि भंगार यांमुळे अडगळ निर्माण होऊन वातावरण वाईट होते, हे अधिकार्यांच्या लक्षात कसे येत नाही ? |