गोवा : ‘कीर्तीचक्र’ पुरस्कारप्राप्त हुतात्मा नरेंद्र मयेकर यांच्या स्मारकावर ‘गोबी मंच्युरियन’ विक्रेत्याचे दुकान !
|
वास्को, २७ ऑक्टोबर (वार्ता.) – हेडलँड सडा, वास्को येथील हुतात्मा स्मारकावर अवैधपणे केलेल्या अतिक्रमणाविषयी गोवा फर्स्ट या संघटनेने तक्रार नोंदवली आहे. या ठिकाणी असलेल्या लेफ्टनंट नरेंद्र मयेकर यांच्या स्मारकावर एका गोबी मंच्युरियन विक्रेत्याने अतिक्रमण करून दुकान थाटले आहे.
या प्रकाराविषयी गोवा फर्स्ट या संघटनेबरोबरच अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नरेंद्र मयेकर यांना ईशान्य भारतात कर्तव्य बजावत असतांना वीरमरण आले होते. २६ फेब्रुवारी २००० मध्ये लेफ्टनंट मयेकर आसाममध्ये तैनात असलेल्या ११ शीख बटालियनमध्ये सेवा देत होते. त्यांना देशाचा दुसरा सर्वोच्च ‘कीर्तीचक्र’ पुरस्कार देण्यात आला आहे. मयेकर यांच्या हुत्मात्मा स्मारकाजवळ अतिक्रमण होऊन ४-५ दिवस झाले, तरी एकाही अधिकार्याने याविषयी विचारणा केलेली नाही. या अतिक्रमणाला अनुमती देणारे तेवढेच उत्तरदायी आहेत. त्यामुळे या सर्वांवर तातडीने कारवाई करावी याविषयी मुख्य सचिव, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी आणि दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे गोवा फर्स्ट या संघटनेने तक्रार नोंदवली आहे.
संपादकीय भूमिका
|