भोपाळमध्ये वायूगळतीमुळे १५ जणांची प्रकृती बिघडली
भोपाळ (मध्यप्रदेश) – येथे मदर इंडिया कॉलनीतील जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये २६ ऑक्टोबरच्या सायंकाळी क्लोरीन सिलिंडरमधून वायूगळती झाल्याने काही नागरिकांना खोकला आणि श्वास घेतांना त्रास जाणवू लागला. जवळपास १५ नागरिकांना रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मदर इंडिया कॉलनीमध्ये जवळपास ४०० कुटुंब रहातात.
वायूगळतीचा प्रभाव नष्ट होण्यासाठी अग्नीशमन दलाच्या सैनिकांनी सिलिंडरला पाण्याच्या टाकीत फेकून दिले. यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला. या सिलिंडरमध्ये ९०० किलोग्रॅम क्लोरीन वायू होता, अशी माहिती भोपाळचे जिल्हाधिकारी अविनाश लावानिया यांनी दिली आहे.
WATCH | भोपाल में क्लोरीन गैस लीक होने से हड़कंप
– कई लोग अस्पताल में भर्ती @anchorjiya | @brajeshabpnews #MadhyaPradesh #Bhopal #Chlorine #GasLeak pic.twitter.com/TpyO1FbdBG
— ABP News (@ABPNews) October 27, 2022