‘साधकांची साधना चांगली व्हावी’, यासाठी त्यांना साहाय्य करणारे पू. (कै.) चत्तरसिंग इंगळे !
१. देहभान विसरून साधना करणे
पू. काका सेवाकेंद्रातील ध्यानमंदिरात बसून नामजप आणि प्रार्थना सतत करत असत. ज्या वेळी त्यांचे ध्यान लागायचे, त्या वेळी तेथे कोणी आले, तरी त्याची चाहूल पू. काकांना लागत नसे. ते देहभान विसरून एकाग्रतेने साधना करायचे.
२. सेवेची तळमळ
अ. पू. काका साधकांचा सत्संग घेऊन त्यांच्याकडून सनातन संस्थेच्या वतीने चालणार्या उपक्रमांचे नियोजन करून घेत असत.
आ. ‘साधकांची साधना चांगली व्हावी’, यांसाठी साधकांना योग्य दृष्टीकोन देऊन साहाय्य करत असत.
इ. पू. काकांना गुरुकार्याची पुष्कळ तळमळ होती.
ई. ते संतपदी विराजमान झाल्यावर समष्टीसाठी नामजप आणि प्रार्थना घंटोन्घंटे करत असत. त्यांनी ही सेवा अनेक वर्षे केली.
३. देव आणि गुरु यांच्याप्रती भाव
पू. इंगळेकाका सेवाकेंद्रातील ध्यानमंदिरात असलेल्या सर्व देवतांची पूजा करायचे. ते प्रतिदिन करत असलेली सेवाही ‘गुरूंचा शिष्य’, या भावाने करत असत.
‘पू. इंगळेकाका यांच्यासारखे संत आम्हाला लाभले’, यांसाठी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !
– श्री. हेमंत खत्री, अमरावती (९.१०.२०२२)