सेवेची तळमळ असणारे आणि सर्व साधकांवर पितृवत् प्रेम करणारे पू. (कै.) चत्तरसिंग इंगळे !
१. प्रेमभाव
‘पू. चत्तरसिंग इंगळे यांचे साधकांवर अमर्याद प्रेम होते. ते साधकांवर वेळप्रसंगी रागवायचे; परंतु त्यातही त्यांचे साधकांवरील प्रेम आणि प्रीतीच दिसून येत असे. सेवेला उशीर झाल्यावर ते साधकांच्या समवेतच झोपायचे. सर्व साधक झोपल्यावर ते झोपत असत. सर्व साधकांवर ते पितृवत् प्रेम करत असत.
२. इतरांचा विचार करणे
मला दुर्ग येथे सेवा करण्याची संधी मिळाली. त्यामुळे माझे त्यांच्याकडे वारंवार जाणे व्हायचे. मी त्यांच्या घरी निवासाला असायचो. त्या वेळी ते माझी पुष्कळ काळजी घ्यायचे. मी सकाळी उठून ध्यानमंदिरात आसंदीत बसून नामजप करायचो. तेव्हा पू. काका माझ्या पायाखाली मऊ कापड ठेवायचे.
३. सेवेची तळमळ
कुंभमेळ्यात ग्रंथप्रदर्शन लावल्यावर पू. काका स्वतः सेवेला यायचे आणि रात्रीपर्यंत प्रदर्शन सेवेच्या ठिकाणी थांबायचे. आम्हीच त्यांना रात्री ९ नंतर त्यांच्या निवासस्थानी परत पाठवायचो.
४. ते साधनेविषयी सर्वांना मार्गदर्शन करायचे.
५. ‘पू. इंगळेकाका हे ईश्वरस्वरूप होते. आता तर ते ‘ईश्वराशी पूर्णपणे एकरूप झाले आहेत’, असे मला वाटते.’
पू. इंगळेकाका यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. शशिकांत पाध्ये, वर्धा (९.१०.२०२२)