ठाकरे गटाची अडीच लाख प्रतिज्ञापत्रे बाद ?
मुंबई – निवडणूक आयोगाने ठाकरे गटाची अडीच लाख प्रतिज्ञापत्रे बाद केली आहेत. ‘निवडणूक आयोगाला अशा प्रकारची कोणतीही प्रतिज्ञापत्रे लागत नाहीत, तसेच एखाद्या पक्षाला मान्यता देणे किंवा चिन्ह देणे याचे नियम ठरलेले आहेत. गेल्या २० वर्षांत वेगवेगळ्या आयुक्तांनी त्यासंदर्भात दिलेले निर्णय प्रमाण आहेत. त्यामुळे कुणाची प्रतिज्ञापत्रे किती आहेत ? कुणाचे रहित झाले ? कुणाचे टिकले ? हे सगळे स्वत:च्या समाधानासाठी चालले आहे’, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ठाकरे गटाचे अधिवक्ता विवेक सिंग यांनी प्रतिज्ञापत्रे बाद केल्याचे वृत्त फेटाळले आहे. आयोगासमोर आपली बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी ठाकरे गटाने २ ट्रक भरून ११ लाख प्रतिज्ञापत्रे जमा केली होती. त्यातील वरील प्रतिज्ञापत्रांचा ‘फॉरमॅट’ चुकीचा असल्याने ती बाद ठरवण्यात आल्याचे समजते.