लहान मुलांना चॉकलेट किंवा चिप्स देऊ नका ! त्याऐवजी सुकामेवा द्या !
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक ७९
‘चॉकलेटमुळे मुलांचे दात किडतात. चॉकलेटमध्ये कोणतीही पोषणमूल्ये नसतात. चिप्समध्ये चव येण्यासाठी कृत्रिम रसायने घातली जातात. ही मुलांच्या आरोग्यासाठी हानीकारक असतात. त्यामुळे मुलांनी कितीही हट्ट केला, तरी त्यांना चॉकलेट आणि चिप्स देऊ नका. त्याऐवजी १ – २ काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता, मनुका, अंजीर, खारिक यांसारखा पोषक सुकामेवा खायला द्या. एखादी काजूबी चॉकलेटपेक्षाही स्वस्त पडते. तरीही काजू, बदाम इत्यादी महाग वाटत असतील, तर मुलांना भाजलेले शेंगदाणे, फुटाणे, तीळगूळ इत्यादी पदार्थ द्या; परंतु चॉकलेट आणि चिप्स देऊन मुलांचे आरोग्य बिघडवू नका !’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.१०.२०२२)