गया (बिहार) येथे अज्ञातांकडून मंदिरातील मूर्तींची तोडफोड !
|
गया (बिहार) – येथील पंचदेव मंदिरातील मूर्तींची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. ही घटना २५ ऑक्टोबरच्या रात्री घडली. या घटनेमुळे स्थानिक हिंदूंमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होऊ लागल्यावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
बिहार के गया में देवताओं की मूर्तियाँ तोड़ी, पुजारी का भी सुराग नहीं: सीता कुंड के सामने स्थित पंचदेव मंदिर बना निशाना, भारी पुलिस बल तैनात#Bihar https://t.co/JGB1brCbGD
— ऑपइंडिया (@OpIndia_in) October 27, 2022
२६ ऑक्टोबरला सकाळी भाविक मंदिरात आले असता त्यांना मूर्तींची तोडफोड झाल्याचे लक्षात आले. याची माहिती हिंदु संघटनांना मिळाल्यावर त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे गोळा झाले. मंदिराचे पुजारी तीर्थानंद बेपत्ता असल्याचेही या वेळी लक्षात आले. पोलीस त्यांचाही शोध घेत आहेत. या घटनेमागे भूमाफियांचा हात असल्याचेही म्हटले जात आहे. ३ वर्षांपूर्वी येथे मंदिराच्या शेजारील भूमीवरून भूमाफियांनी हिंसाचार केला होता.
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक |