इराणच्या शिया मशिदीत झालेल्या गोळीबारात १५ जण ठार, ४० हून अधिक लोक घायाळ
इस्लामिक स्टेटने घेतले आक्रमणाचे दायित्व
तेहरान (इराण) – इराणच्या शिराज शहरामध्ये २६ ऑक्टोबरला शिया मुसलमानांचे पवित्र स्थळ असणार्या शाह चेराग मशिदीमध्ये नमाजाच्या वेळी करण्यात आलेल्या अंदाधुंद गोळीबारात १५ ठार, तर ४० हून अधिक जण घायाळ झाले. ३ सशस्त्र लोकांनी हा गोळीबार केला. यातील दोघांना पोलिसांनी अटक केली, तर एक जण पसार झाला आहे.
Gunmen attack major Shiite holy site in Iran, killing 15 https://t.co/5na3WtOEIt
— The Times of Israel (@TimesofIsrael) October 26, 2022
प्राथमिक माहितीनुसार या आक्रमणाचे दायित्व इस्लामिक स्टेटने स्वीकारले आहे. आक्रमण करणारे इराणी नागरिक नव्हते, असेही समोर आले आहे.