बलात्काराला विरोध केल्याने नौशादकडून अल्पवयीन हिंदु युवतीची हाडे तोडून हत्या !
|
बलिया (उत्तरप्रदेश) – येथे १४ ऑक्टोबर या दिवशी एका १३ वर्षीय हिंदु युवतीवर नौशाद नावाच्या नराधमाने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तिने त्यास विरोध केल्याने नौशादने तिचा गळा दाबला, तसेच तिला अमानुष मारहाण केली. एवढेच नाही, तर तिची हाडे तोडली आणि तिच्या हाताच्या नसाही कापल्या. या वेळी त्याने तिचे पाय कापण्याचाही प्रयत्न केला, अशी माहिती पोलिसांनी दिली. अत्यवस्थ स्थितीत तिला रुग्णालयात भरती करण्यात आले. शेवटी २२ ऑक्टोबर या दिवशी तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी नौशादला अटक केली आहे. मृत पीडितेच्या कुटुंबियांनी ‘नौशादला तडपून ठार मारण्यात यावे’, अशी मागणी केली आहे.
रेप नहीं कर पाया तो गला दबाया, हड्डियाँ तोड़ी, पैर काटने का प्रयास: जिस नौशाद को हिन्दू परिवार मानता था बेटा, उसने ही घर की बच्ची को मार डाला#Balia #Murderhttps://t.co/11CKB8pg8G
— ऑपइंडिया (@OpIndia_in) October 26, 2022
या घटनेविषयी पीडितेच्या वडिलांना समजल्यावर ते म्हणाले होते की, ते नौशादला स्वत:चा मुलगा असल्यासारखे मानायचे. त्याला घरी सहजपणे यायची मुभा होती. तो त्यांच्या घरापासून केवळ १० मीटर अंतरावर रहायचा.
संपादकीय भूमिका
|