५ पैकी १ किशोरवयीन स्वतःची नग्न छायाचित्रे सामाजिक माध्यमांद्वारे प्रसारित करतो !
रसातळाला चाललेली नैतिकता !
लॉसएंजिल्स (अमेरिका) – मुलांचे ऑनलाईन लैंगिक शोषण होऊ नये, यासाठी संगणकीय प्रणाली बनवणारी अशासकीय संस्था ‘थॉर्न’ने एक अहवाल प्रकाशित केला आहे. यात म्हटले आहे की, ५ पैकी १ किशोरवयीन स्वतःचे नग्न छायाचित्र सामाजिक माध्यमांद्वारे प्रसारित करतो.
2 साल में 60% बढ़ गई न्यूड सेल्फी शेयर करने वाले नाबालिगों की संख्या, शोध में जताई गई चिंता: खुलासा – हर 5 में से 1 किशोर ने शेयर किए अपने न्यूड फोटोज#Minors #NudeSelfiehttps://t.co/y1SNRHTyDf
— ऑपइंडिया (@OpIndia_in) October 25, 2022
१. अशा घटनांमध्ये ही मुले स्वतःहून अशी छायाचित्रे प्रसारित करतात, तसेच त्यांचे मित्र, मैत्रिणी यांच्या मागणीमुळे असे करतात. काही वेळा त्यांच्यावर दबावही आणला जातो. या मुलांना बहुतांश वेळेला ‘ही छायाचित्रे पुढे कुठपर्यंत जाणार आहेत ?’, हे ठाऊक नसते.
२. या अहवालासाठी वर्ष २०१९ नंतर ‘थॉर्न‘ने ९ ते १७ वर्षे वयोगटातील १ सहस्रांहून अधिक मुलांशी चर्चा केली. वर्ष २०१९ नंतर अशा प्रकारचे छायाचित्रे प्रसारित करण्याच्या घटनांत सातत्याने वाढ होत आहे.