हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक मनोज खाडये यांचा ‘हलाल जिहाद’च्या संदर्भात सांगली जिल्हा जागृती दौरा !
तालुका स्तरावर ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ची स्थापना, तसेच व्यापक जनजागृती करण्याचा निर्धार !
सांगली – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हलाल जिहाद’च्या संदर्भात देशव्यापी जागृती करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभाग, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाड्ये यांचा सांगली जिल्ह्यात जागृती दौरा पार पडला. यात ठिकठिकाणी व्यापारी, उद्योजक आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या बैठका, वैयक्तिक संपर्क यांद्वारे प्रबोधन करण्यात आले. या प्रबोधनामुळे तालुका स्तरावर ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ची स्थापना करण्यात आली. या वेळी अनेक व्यापारी-उद्योजक यांनी ‘हलाल शिक्का’ असलेली उत्पादने विक्रीस न ठेवण्याचा निश्चय केला, तसेच ‘हलाल’ संदर्भात व्यापक जनजागृती करण्याचा निर्धार सर्वांनीच केला.
६ तालुक्यांमध्ये हलाल सक्तीविरोधी कृती समितीची स्थापना !
या दौर्यात ६ तालुक्यांमध्ये हलाल सक्तीविरोधी कृती समितीची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून धर्मप्रेमींनी पुढाकार घेऊन बत्तीसशिराळा, ईश्वरपूर, कवठेमहांकाळ येथे प्रशासनास निवेदन दिले. या पुढील काळात प्रत्येक तालुक्यात प्रशासनाला असे निवेदन देण्यात येणार आहे.
बत्तीस शिराळा येथे माजी सरपंच आणि ‘युवा संघटने’चे अध्यक्ष श्री. देवेंद्र पाटील यांनी हिंदु जनजागृती समिती करत असलेल्या राष्ट्र अन् धर्म यांच्या अनमोल कार्याविषयी श्री. मनोज खाडये यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला.
वैशिष्ट्यपूर्ण प्रतिसाद
१. ईश्वरपूर येथे ‘श्री लक्ष्मी नारायण पाटीदार सनातन युवा मंडळा’च्या पुढाकाराने समाजासाठी आयोजित केलेल्या बैठकीत श्री. मनोज खाडये यांनी उपस्थितांचे प्रबोधन केले. या बैठकीत समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. शामजीभाई रावजीभाई पटेल यांनी व्यासपिठावरून ‘समाजातील लोकांनी हिंदूंकडूनच वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य द्यावे, तसेच प्रवास करतांना हिंदु चालक असलेल्या रिक्शातूनच प्रवास करा’, असे आवाहन केले. येथे पटेल समाजाचे ८० समाजबांधव उपस्थित होते.
२. येळावी येथील सांस्कृतिक भवन येथे धर्मप्रेमी सर्वश्री अरुण यादव आणि निवास पाटील यांच्या पुढाकाराने पार पडलेल्या बैठकीसाठी ४५ धर्मप्रेमी उपस्थित होते. येथे गावातील युवक आणि ग्रामस्थ यांच्यासाठी लवकरच एक स्वतंत्र मार्गदर्शन आयोजित करण्याचे ठरवण्यात आले.
३. गावभाग येथे व्यापारी आणि अधिवक्ता यांच्या झालेल्या बैठकीत ‘हा विषय आम्ही इतरांपर्यंत पोचवू’, असे सर्वांनीच सांगितले.
४. कवठेमहांकाळ येथील नवनाथ मंदिरात हिंदुत्वनिष्ठांचे प्रबोधन करण्यात आले. यात प्रामुख्याने संगमेश्वर मंदिराचे पुजारी श्री. शिवप्रसाद शुक्ला, अधिवक्ता स्वप्नील लाड, रा.स्व. संघाचे श्री. अर्जुन पाटील, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री अनिल पाटील, कुमार जाधव, प्रकाश थोरात, अमित थोरात यांसह अन्य उपस्थित होते.
५. आटपाडी येथे चौंडेश्वरी मंदिरात व्यापारी, हिंदुत्वनिष्ठ आणि, नागरिक यांच्यासाठी झालेल्या मार्गदर्शनानंतर सर्वांनी व्यापारी, तसेच विविध स्तरांवर प्रबोधन करण्याचा निश्चय केला.
६. ‘सांगली, सातारा, कोल्हापूर परिसरांतील ‘हलाल प्रमाणपत्र’ घेऊन उत्पादने विक्री करणार्या आस्थापनांना ‘वाळवा युवा उत्थान समिती’च्या माध्यमातून विरोध करू’, असा निश्चय वाळवा येथील धर्मप्रेमींच्या बैठकीत करण्यात आला.