संभाजीनगर येथे फटाके फोडतांना २० मुलांचे डोळे आणि चेहरे भाजले !
संभाजीनगर – दीपावलीच्या दिवशी शहरात फटाके फोडतांना १६ मुलांचे डोळे आणि चेहरे यांना गंभीर जखम झाली आहे. या मुलांवर शासकीय रुग्णालयामध्ये (घाटी रुग्णालय) उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे, तर यातील एका १९ वर्षीय मुलाच्या डोळ्याला गंभीर जखम झाली आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. दिवाळीनिमित्त फटाके फोडतांना आतापर्यंत शहरात जवळपास २० मुलांचे डोळे आणि चेहरे भाजले आहेत.
खामगाव येथे तरुणांनी एकमेकांवर पेटलेले फटाके फेकले !
जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील खामगाव येथे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तरुणांचे ३ गट फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांवर पेटलेले फटाके फेकत होते. यात कुणीही घायाळ झाले नसले, तरी हा भयावह प्रकार होता. याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांवरही प्रसारित झाला आहे. याविषयी गावकर्यांनी त्या तरुणांना समज दिली आहे.