कॅनडात दिवाळी उत्सवात खलिस्तान्यांचा गोंधळ : भारतीय समुदायाकडून चोख प्रत्युत्तर
ब्रॅम्पटन (कॅनडा) – येथे २४ ऑक्टोबरला भारतीय समुदायातील लोक दिवाळी साजरी करत असतांना तेथे खलिस्तानवादी घुसले आणि त्यांनी हातात खलिस्तानी झेंडे घेऊन घोषणाबाजी चालू केली. त्यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्याच वेळी कॅनेडियन पोलीस घटनास्थळी पोचले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या वेळी भारतीय समुदायाच्या लोकांनी ‘भारतमाता की जय’च्या जोरदार घोषणा दिल्या. या घटनेचा व्हिडिओही प्रसारित झाला आहे.
सौजन्य इंडिया टुडे
कॅनडातील खलिस्तानींनी यापूर्वीही अशा प्रकारची कृत्ये केली आहेत. यापूर्वी खलिस्तानी आतंकवाद्यांनी ब्रॅम्पटनमधील श्री स्वामीनारायण मंदिराची तोडफोड केली होती. कॅनडातील खलिस्तानींनी ६ नोव्हेंबर या दिवशी कॅनडात खलिस्तानसाठी सार्वमत घेण्याची घोषणा केली आहे; मात्र भारताने यावर आधीच आक्षेप घेतला आहे.