कर्नाटकात हिंदु कार्यकर्त्यावर प्राणघातक आक्रमण
बजरंग दलाच्या मृत नेत्याच्या बहिणीला जिवे मारण्याची धमकी
शिवमोग्गा (कर्नाटक) – कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यात धर्मांधांनी एका हिंदु संघटनेच्या प्रकाश नावाच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक आक्रमण केले. या प्रकरणी १४ अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील अन्वेषण चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्रकाश कामावरून घरी परतत असतांना ३ दुचाकीस्वारांनी त्यांच्यावर आक्रमण केले. या वेळी आक्रमणकर्त्यांनी हिंदुविरोधी घोषणाही दिल्या. या विरोधात हिंदु संघटनांनी रुग्णालयाबाहेर निदर्शने केली आणि आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली.
#Shivamogga: Hindu activist brutally attacked by unknown miscreants. The victim has suffered injuries on the head & is admitted to a hospital.
It is alleged that the attack is linked to the Harsha murder case.@dpkBopanna shares more details with @anchoramitaw & @MalhotraShivya pic.twitter.com/TRyHM7fA6K
— TIMES NOW (@TimesNow) October 25, 2022
बजरंग दलाचे नेते हर्ष यांच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी
पोलीस अधीक्षक मिथुन कुमार यांनी सांगितले की, बजरंग दलाचे नेते हर्ष यांची फेब्रुवारीमध्ये चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. आता हर्ष यांची बहीण आणि इतर कुटुंबीय यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यानंतर हिंदु कार्यकर्त्यांनी एका धर्मांधाच्या गाडीची तोडफोड केली.
संपादकीय भूमिकाकर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंवर अशी आक्रमणे होणे आणि त्यांच्या कुटुंबियांना धमक्या मिळणे अपेक्षित नाही. सरकारने दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे ! |