सनातनच्या आश्रमांत, तसेच धर्मप्रसाराच्या सेवांसाठी वाहन-चालकांची आवश्यकता !

साधक, तसेच वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना सेवेची सुसंधी !

‘सनातनचे राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे कार्य दिवसेंदिवस विस्तारत आहे. या कार्याचा आवाका पुष्कळ वाढल्याने वाहन चालवू शकणार्‍यांची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे सनातनच्या आश्रमांत, तसेच प्रसाराच्या सेवांमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहन-चालकांची तातडीने आवश्यकता आहे.

ही सेवा करण्यास इच्छुक असलेल्यांकडे दुचाकी आणि चारचाकी वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) असणे आवश्यक आहे. ‘बस बॅच’, मालवाहू वाहने (ट्रक) चालवण्याचा परवाना, तसेच व्यावसायिक वाहन परवाना (प्रोफेशनल लायसन्स) असल्यास अधिक चांगले ! जे साधक पूर्णवेळ अथवा काही दिवस या सेवेत सहभागी होऊ शकतात, त्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून खालील सारणीनुसार माहिती पाठवावी. शनिवारी-रविवारी, तसेच अन्य सुटीच्या दिवशी सेवेत सहभागी होऊ शकत असल्यास तसेही कळवावे. वाहन चालवता न येणारे साधक ही सेवा करण्यास इच्छुक असतील, तर त्यांना वाहन चालवायला शिकवण्याचे नियोजन करता येईल.

नाव आणि संपर्क क्रमांक

सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०

संगणकीय पत्ता : sanatan.sanstha2025@gmail.com

टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा, पिन – ४०३४०१.’

(२३.१०.२०२२)