उभा भगवंत सद्गुरु स्वातीताईंच्या रूपात समष्टी तिरी ।
‘सद्गुरु स्वाती खाडये यांनी ३०.३.२०२१ या दिवशी साधकांचा समष्टी सेवेविषयी सत्संग घेतला. त्या वेळी मला भगवंताने पुढील ओळी सुचवल्या, त्या सद्गुरुचरणी अर्पण करते.
सद्गुरु संगे सेवेकरी । चला विहार करूया ।
समष्टी श्री गुरुचरण प्राप्तीचा ध्यास घेऊया ।। १ ।।
ऊठा, ऊठा हो श्री गुरूंचे सेवेकरी ।
असे जरी कठीण काळ कितीही या भूवरी ।
उभा भगवंत सद्गुरु रूपात (टीप १) समष्टी तिरी ।। २ ।।
चारही वर्णांची सेवा करवून घेतसे सत्वरी ।
जागृत हिंदूंना राष्ट्र अन् धर्म यांच्याप्रती कर्तव्य करण्या ।
त्याग करवून घेतसे विविध माध्यमांतूनी ।। ३ ।।
या विहंगम विहारात आनंदून जाती सेवेकरी ।
अखंड जागर करूया समष्टी रूपाचा श्री गुरुकीर्तनी ।
श्री गुरूंचा वरदहस्त अखंड आपल्या मस्तकावरी ।। ४ ।।
सद्गुरुमाऊली स्वातीताई (टीप २) तळमळती ।
सेवेकर्यांच्या उद्धारासाठी ।
सेवेकरी सद्गुणांची गुंफण करती, कृतज्ञतेची पुष्पे वाहूनी ।विसावती सद्गुरुचरणी सर्व सेवेकरी ।। ५ ।।
टीप १ आणि २ – सद्गुरु स्वाती खाडये
– सौ. सुनीता पंचाक्षरी, अंबेजोगाई, जिल्हा बीड. (१८.७.२०२१)
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |