मुंबईतील व्यापार्याकडून केदारनाथ मंदिरात सोन्याचा पत्रा बसवला जाणार !
पुजार्यांची आंदोलनाची चेतावणी !
मुंबई – येथील एका व्यावसायिकाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंड येथील केदारनाथ मंदिरातील गाभार्यात चांदीचा पत्रा असलेल्या भिंतीवर सोन्याचा पत्रा बसवण्यात येत आहे. यासाठी २३० किलो सोने वापरण्यात आले आहे. या सोन्याच्या पत्र्यावर भगवान शंकराचे प्रतीक असलेले शंख, त्रिशूळ, डमरू अशी चिन्हे कोरण्यात आली आहेत. तसेच, ‘जय बाबा केदार’, ‘हर हर महादेव’ असेही कोरण्यात आले आहे.
हे कोट्यवधी रुपयांचे दान करण्यासाठी या व्यापार्याला बद्रीकेदार मंदिर समिती आणि उत्तराखंड सरकार यांनी या सुवर्ण जडावाच्या कामाला अनुमती दिली आहे; मात्र स्थानिक पुजार्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला होता. पुजार्यांच्या म्हणण्यानुसार, यामुळे मंदिराच्या गर्भगृहातील पौराणिक परंपरेला धक्का लागत आहे. त्यामुळे पुजार्यांनी याचा विरोध करत उपोषणाची चेतावणी दिली आहे.