तापानंतरच्या थकव्यावर ‘सनातन लघुमालिनी वसंत’
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक ७७
‘बर्याच वेळा ताप येऊन गेल्यावर थकवा येतो. काही वेळा हा थकवा पुष्कळ दिवस रहातो. हा थकवा जाण्यासाठी १५ दिवस प्रतिदिन सकाळी रिकाम्या पोटी ‘सनातन लघुमालिनी वसंत’ची १ गोळी बारीक पूड करून २ (चहाचे) चमचे तुपात मिसळून खावी. वर वाटीभर गरम पाणी किंवा गरम दूध प्यावे. यानंतर न्यूनतम १ घंटा काही खाऊ-पिऊ नये.
असे केल्याने थकवा जाऊन उत्साह येतो, असा अनुभव आहे. १५ दिवसांनंतरही थकवा न्यून न झाल्यास वैद्यांचा समादेश (सल्ला) घ्यावा.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.१०.२०२२)