कवलापूर (जिल्हा सांगली) येथील विमानतळाची जागा अल्प मूल्यात देण्याचा प्रयत्न !
सांगली – कवलापूर येथील विमानतळाची जागा खासगी आस्थापनाला कवडीमोल मूल्यात देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी नुकतीच भाजपचे प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार यांनी तेथे भेट देऊन जागेची पहाणी केली आणि ‘जागा खासगी आस्थापनाला देण्याचा डाव हाणून पाडू’, असे सांगितले. या संदर्भात पृथ्वीराज पवार म्हणाले, ‘‘या जागेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये मिळवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. वास्तविक या भूखंडाचा लाभ येतील भूमीपुत्रांनाच मिळाला पाहिजे. असे न झाल्यास आम्ही पंचक्रोशीतील नागरिकांना एकत्र करून जनआंदोलन उभारू. या संदर्भातील सर्व माहिती महमूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सांगली दौर्यावर आले असता त्यांना देण्यात आली आहे. त्याविषयी पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.’’