अलीगड येथे महाविद्यालयीन हिंदु विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा धर्मांध मुसलमानाचा प्रयत्न
अलीगड (उत्तरप्रदेश) – अलीगड जिल्ह्यातील एका महाविद्यालयामध्ये ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण समोर आले आहे. महाविद्यालयातील एका हिंदु विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करणार्या एका मुसलमान तरुणाला महाविद्यालयाच्या अधिकार्यांनी पोलिसांच्या कह्यात दिले. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार याच महाविद्यालयातील एक मुसलमान विद्यार्थिनी आहे, असे पीडित मुलीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
उत्तर प्रदेश के अलीगढ़ में कॉलेज की एक छात्रा ने मुस्लिम छात्रा पर बाहरी मुस्लिम लड़कों से दोस्ती करने की कोशिश करवाने का आरोप लगाया है।https://t.co/uikBJfjaB9
— ऑपइंडिया (@OpIndia_in) October 23, 2022
१. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ‘लव्ह जिहाद’चे हे प्रकरण अलीगडच्या धर्म समाज महाविद्यालयात घडले आहे.
२. पीडित हिंदु विद्यार्थिनीने आरोप केला आहे की, ती वर्गाच्या बाहेर मंदिराजवळ बसली होती. त्यानंतर त्याच महाविद्यालयाची एक मुसलमान विद्यार्थिनी एका बाहेरील मुसलमान तरुणासोबत तेथे पोचली आणि तिच्याशी बोलू लागली. त्या मुसलमान तरुणाशी तिची मैत्री घडवून आणण्याचा त्या मुसलमान विद्यार्थिनीचा प्रयत्न चालू होता.
३. तेवढ्यात महाविद्यालयात शिकणारे अनेक हिंदू विद्यार्थी तेथे आले. त्यांनी त्या बाहेरच्या मुलाचा परिचय विचारला; मात्र तो काही नीट सांगू शकला नाही. विद्यार्थ्यांनी आरोपी मुसलमान तरुणाला बेदम मारहाण केली आणि महाविद्यालयाच्या प्रशासनाच्या कह्यात दिले. तेथून त्याला पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आले.
४. या महाविद्यालयाचे विद्यार्थी नेते अमित गोस्वामी यांच्या म्हणण्यानुसार धर्म समाज महाविद्यालयामध्ये यापूर्वीही ‘लव्ह जिहाद’च्या घटना घडल्या आहेत.