अजमेर दर्ग्याच्या पदाधिकार्याच्या मुलाला खलिस्तानी आतंकवाद्याला साहाय्य केल्याच्या प्रकरणी अटक
अजमेर (राजस्थान) – पंजाब पोलिसांनी येथील अजमेर दर्ग्याचे सेवक आणि अंजुमन संस्थेच्या पदाधिकार्याचा मुलगा तौसीफ चिश्ती याला अटक केली आहे. खलिस्तानी आतंकवादी चरत सिंह याला साहाय्य केल्याच्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. चरत सिंह याने त्याच्या साथीदारांसह पंजाबच्या मोहाली येथील पोलीस मुख्यालयावर आक्रमण केले होते. या आक्रमणासाठी तौसीफ याने चरत सिंह याला पिस्तुल मिळवून दिले होते. चरत सिंह याला मुंबईत अटक करण्यात आलेली आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार पंजाबमधून एक एके ४७ रायफल आणि १०० काडतुसे जप्त करण्यात आली होती. चरत सिंह ‘बब्बर खालसा’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा आतंकवादी आहे.
Punjab Police arrest Ajmer Dargah cleric’s son Tausif Chishti for having links with terrorist group Babbar Khalsahttps://t.co/BxDUAsD9TB
— OpIndia.com (@OpIndia_com) October 23, 2022
संपादकीय भूमिकाराजस्थान येथे कन्हैयालाल यांच्या हत्येच्या प्रकरणातही अजमेर दर्ग्याच्या एका सेवकाला अटक करण्यात आली होती. एकूणच या दर्ग्याचा कुणाकुणाशी संबंध आहे, हे लक्षात घेता तेथील सर्वांची कसून चौकशी करायला हवी ! |