प्रत्येक हिंदूच्या हृदयात राममंदिर स्थापन होण्यासाठी ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ सांगून त्याप्रमाणे साधकांकडून आचरण करवून घेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

साधकांना राष्ट्र आणि धर्म यांविषयी मार्गदर्शन करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘९.११.२०१९ या शुभदिनी भगवान श्रीरामाच्या कृपेनेच श्रीरामजन्मभूमी प्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाने ‘अयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमी भगवान श्रीरामाचीच आहे’, असा निर्णय दिला आणि राममंदिर बांधण्याचे समस्त हिंदूंचे स्वप्न साकार झाले. त्या वेळी मला पुष्कळ आनंद झाला आणि माझी प्रभु श्रीरामाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली. तेव्हा मागील ३० वर्षे अध्यात्मप्रसार करण्यासाठी आणि रामराज्य येण्यासाठी प्रयत्नरत असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मला स्मरण होऊन त्यांच्याकडून शिकायला मिळालेल्या पुढील सूत्रांची आठवण झाली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘भक्तांनी मंदिरांचे संरक्षण करणे आणि व्यवस्थापन पहाणे आवश्यक आहे अन् असे भक्त सिद्ध होण्यासाठी हिंदूंनी साधना करणे अनिवार्य आहे’, असे सांगणे

पू.शिवाजी वटकर

मी परात्पर गुरु डॉक्टरांना ‘आपण मंदिर बांधायला प्राधान्य का देत नाही ?’, असे विचारले. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘सध्या देशात अनेक मंदिरे आहेत. मंदिर बांधण्याच्या आधी ‘मंदिरांचे संरक्षण, व्यवस्थापन आणि मंदिर बांधण्याचा उद्देश कसा सफल होईल ?’, हे पाहिले पाहिजे. भक्तांनी मंदिरातील देवाची पूजा आणि व्यवस्थापन पहायला हवे. मंदिरातून लोकांना धर्मशिक्षण देऊन त्यांना धर्माचरण आणि साधनामार्ग, यांकडे वळवले पाहिजे; परंतु आता तसे होतांना दिसत नाही. पुढे आपत्काळात मंदिराचे व्यवस्थापन आणि त्याचे रक्षण, हे करणारेही हल्लीप्रमाणे कुणी नसतील. तेव्हा सर्व काही आपल्यालाच पहावे लागेल. ते करण्यासाठी, म्हणजेच भक्त होण्यासाठी साधना करावी लागणार आहे.’’

– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१३.११.२०१९)