बंगालच्या किनार्याला ‘सितरंग’ चक्रीवादळाची धडकण्याची शक्यता !
५ राज्यांना सतर्कतेची चेतावणी
नवी देहली – भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मध्य बंगालच्या उपसागरावर ‘सितरंग’ नावाचे चक्रीवादळ सिद्ध झाले आहे. ते उत्तर-ईशान्येकडे सरकत जाईल. २५ ऑक्टोबरला सकाळी १० च्या सुमारास ते बांगलादेशच्या किनार्याला धडकण्याची दाट शक्यता आहे.
या चक्रीवादळामुळे ईशान्य भारताच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्रिपुरा, आसाम, मिझोराम, मणीपूर आणि नागालँड या राज्यांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. त्रिपुरा सरकारने २६ ऑक्टोबरपर्यंत सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.