पुणे येथे रेल्वे अधिकार्याला सक्तमजुरीची शिक्षा !
बेहिशेबी मालमत्तेचे प्रकरण
पुणे – बेहिशेबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी मध्य रेल्वेच्या तत्कालीन वरिष्ठ अभियंत्याला पाच वर्षांची सक्तमजुरी आणि दोन लाख रुपये दंड भरण्याची शिक्षा केंद्रीय अन्वेषण विभागाच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक न्यायालयाने सुनावली. सत्यजित दास (वय ६३ वर्षे) असे शिक्षा झालेल्या अधिकार्याचे नाव आहे. ‘आरोपीने दंड न भरल्यास ६ मासांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल’, असेही न्यायालयाने निकालपत्रात म्हटले आहे. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी अधिवक्ता अभयराज आरेकर यांनी काम पाहिले.
आरोपीने लोकसेवक असतांना कायदेशीर कर्तव्य पार न पाडता अवैध मार्गाने संपत्ती जमा करण्याचा गंभीर गुन्हा केला असल्याने आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा आणि दंड ठोठावण्यात यावा. त्यामुळे समाजात अशा गुन्ह्याविरोधात योग्य संदेश जाईल असा युक्तीवाद आरेकर यांनी केला. सरकारी पक्ष आणि बचाव पक्ष यांची बाजू ऐकल्यावर न्यायालयाने आरोपीला शिक्षा ठोठावली.
संपादकीय भूमिकाअशा भ्रष्ट अधिकार्यांची सर्वच मालमत्ता काढून घेऊन त्यांना सक्तमजुरीची शिक्षा द्यायला हवी ! |