‘श्री महालक्ष्मी अन्न छत्र सेवा ट्रस्ट’च्या वतीने गरजूंना दीपावली फराळाचे विनामूल्य वाटप !
कोल्हापूर – ‘श्री महालक्ष्मी अन्न छत्र सेवा ट्रस्ट’च्या वतीने नेहमीच गरजवंतांना साहाय्य करण्यात येते. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर जे गरीब आर्थिक परिस्थितीमुळे दीपावली साजरी करू शकत नाहीत, अशा ७५० गरीब आणि गरजूंना ३ सहस्र किलो फराळाचे विनामूल्य वाटप करण्यात आले. या संदर्भात ट्रस्टचे अध्यक्ष श्री. राजू मेवेकरी म्हणाले, ‘‘कोल्हापूर शहरात आर्थिक परिस्थितीमुळे अनेक कुटुंबांत दीपावलीचा फराळ करता येत नाही. अशा कुटुंबांना फराळाचे वाटप करून त्यांच्या तोंडावळ्यावर हास्य फुलवण्याचा प्रयत्न केला आहे. या उपक्रमासाठी साहाय्य केलेल्या दानशूर व्यक्तींच्या सहकार्यामुळे आम्ही हा उपक्रम यशस्वी करू शकलो.’’