हिंदु देवस्थानाच्या भूमी घोटाळाप्रकरणी भूखंड माफियांच्या विरोधात गुन्हे नोंद करण्याचे संभाजीनगर खंडपिठाचे आदेश !
बीड – जिल्ह्यातील हिंदु देवस्थानाच्या भूमी घोटाळाप्रकरणी भूखंड माफियांच्या विरोधात गुन्हे नोंदवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने दिले आहेत. ‘जिल्ह्यातील विठोबा देवस्थान, मुर्शदपूर, खडकत; खंडोबा देवस्थान, श्रीरामचंद्र देवस्थान, पिंपळेश्वर देवस्थान यांसह अन्य देवस्थानांच्या भूमी घोटाळा प्रकरणात प्रथम फौजदारी गुन्हे नोंद करा आणि नंतर अन्वेषण करा’, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने दिले आहेत. सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्या याचिकेवर निर्णय देतांना न्यायालयाने ‘पोलीस आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिलेली तक्रारच प्रथमदर्शी अहवाल म्हणून ग्राह्य धरावी’, असेही म्हटले आहे.
जिल्ह्यात हिंदु देवस्थानाच्या भूमीची अवैध हस्तांतरणाची ८ प्रकरणे समोर आली होती. त्यानंतर या प्रकरणाचे अन्वेषण विशेष अन्वेषण पथकाकडे सोपवण्यात आले होते; मात्र पथकाने अहवाल दिल्यानंतरही फौजदारी कारवाई न झाल्याने राम खाडे यांनी संभाजीनगर खंडपिठात धाव घेतली.