‘हलाल सर्टिफिकेशन’ देणार्या संस्थांची राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने चौकशी करा ! – निवेदनातील मागणी
वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे धर्मप्रेमी अधिवक्ते आणि हिंदु जनजागृती समिती यांनी जिल्हाधिकार्यांना दिले निवेदन !
वाराणसी (उत्तरप्रदेश) – राष्ट्रासाठी अतिशय गंभीर संकट निर्माण करणार्या ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या विरोधात कार्यवाही करण्यात यावी, तसेच ‘हलाल सर्टिफिकेशन’ देणार्या संस्थांची राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अन्वेषण संस्थांकडून विस्तृत चौकशी करण्यात यावी, या मागण्यांसाठी धर्मप्रेमी अधिवक्ते आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून येथील जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर करण्यात आले.
या वेळी अधिवक्ता अरुणकुमार मौर्य, अधिवक्ता संजीवन यादव, अधिवक्ता अनिल चौरसिया नागवंशी, अधिवक्ता प्रियंका पाण्डेय, अधिवक्ता अवनीश रॉय, अधिवक्ता बृजेश कुमार मिश्रा, अधिवक्ता सत्येंद्र तिवारी, अधिवक्ता कमलकांत त्रिपाठी आणि हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री राजन केसरी, प्रेमप्रकाश कुमार आदी उपस्थित होते.
We have to take a pledge that, henceforth, we will not buy any products with a halal symbol, will be cautious and will create awareness in the society about it. https://t.co/Cu5saP5xbF
'Hinduon ka tyohar, Hinduon se vyavhar’ pic.twitter.com/qTQ6fgfquV
— Vishwanath Kulkarni (@vishwanathkul) October 21, 2022
वैशिष्ट्यपूर्ण : अधिवक्ता संजीवन यादव आणि अधिवक्ता अरुणकुमार मौर्य यांनी निवेदनावर स्वाक्षरी करण्यासाठी न्यायालय परिसरातील ३० अधिवक्त्यांना प्रोत्साहित केले.