संघटित होऊनी मिळवू आशीर्वाद गुरूंचा ।
‘२४.१०.२०२२ या दिवशी दीपावली आहे. त्यानिमित्त ‘कविता कशी लिहावी ?’, हे मला सुचत नव्हते. आज संध्याकाळी नामजप करतांना गुरुकृपेने मला आरंभीच्या दोन ओळी सुचल्या. त्या लिहित असतांना पुढील कडवीही सुचत गेली. ती श्री गुरूंच्या चरणी अर्पण करत आहे.’
सण दीपावलीचा असे तेजाचा ।
तिमिरातूनी तेजाकडे जाण्याचा ।। १ ।।
मनातील अंधःकार घालवण्याचा ।
उजळवूनी ज्ञानसूर्य, भाग्योदय साधण्याचा ।। २ ।।
शरणागतीने मिळवू वर्षाव कृपेचा ।
तोडोनिया बंध स्वकोष अन् कुसंस्कार यांचा ।। ३ ।।
नववर्षदिनी करूनी संकल्प उपासनेचा ।
यत्न करू स्वभावदोष अन् अहं त्यागण्याचा ।। ४ ।।
पूर्ण करण्या संकल्प हिंदुराष्ट्राचा ।
संघटित होऊनी मिळवू आशीर्वाद गुरूंचा ।। ५ ।।
– श्री. धैवत वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.१०.२०२२)