समस्त हिंदु आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यासह ८ जणांची निर्दोष मुक्तता !
पुणे – पौड रस्त्यावरील कोंडवाड्यात ठेवलेली जनावरे आणि गायी घेऊन जाण्यासाठी आलेले शकील कुरेशी आणि नासीर कुरेशी यांना मारहाण केल्याच्या आरोपातून समस्त हिंदु आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यासह ८ जणांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर्.व्ही. डाफरे यांनी दिले आहेत. १९ वर्षांनंतर या खटल्याचा निकाल लागला आहे.