देवदिवाळी
१. तिथी
मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा
२. महत्त्व
कुलस्वामी, कुलस्वामिनी आणि इष्टदेवता यांच्या समवेतच अन्य देवतांचीही वर्षातून एखाद्या दिवशी पूजा होऊन त्यांना नैवेद्य अर्पण होणे आवश्यक असते. ते या दिवशी केले जाते.
पूजन : आपले कुलदैवत आणि इष्टदेवता यांच्याबरोबरच स्थानदेवता, वास्तूदेवता, ग्रामदेवता आणि गावातील अन्य मुख्य अन् उपदेवता यांचे, तसेच महापुरुष, वेतोबा इत्यादी निम्नस्तरीय देवता यांचे पूजन करून त्यांना त्यांच्या मानाचा भाग पोचवण्याचे कर्तव्य या दिवशी पार पाडले जाते. देवदिवाळीला पक्वान्नांचा महानैवेद्य दाखवला जातो.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’)