बदलापूर येथील कोंडेश्वर कुंडात बुडून ४ तरुणांचा मृत्यू !
ठाणे, २२ ऑक्टोबर (वार्ता.) – बदलापूरजवळील कोंडेश्वर या पर्यटनस्थळी वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेले स्वयं मांजरेकर (वय १८ वर्षे), आकाश झिंगा (वय १९ वर्षे), सूरज साळवे (वय १९ वर्षे) आणि लिनस उच्चपवार (वय १९ वर्षे) या ४ मित्रांचा तेथील कुंडात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. या प्रकरणी कुळगाव पोलीस ठाणे येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.