देवता-राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले आणि चिनी फटाके यांच्या विक्रेत्यांवर कारवाई करण्याची हिंदुत्वनिष्ठांची मागणी !
शिरोली-पुलाची (जिल्हा कोल्हापूर), २२ ऑक्टोबर (वार्ता.) – देवता-राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेल्या फटाके विक्रेत्यांवर कारवाई करावी, तसेच चिनी बनावटीच्या फटाक्यांची विक्री करणार्यांवर तात्काळ योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी शिरोली पुलाची येथे साहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील यांना दिले. या प्रसंगी विश्व हिंदु परिषद-बजरंग दलाचे श्री. प्रशांत कागले, सर्वश्री अनिल चौगुले, नीलेश शिंदे, संदीप पाटील, सुजित पाटील, अनुज जगताप, मयुर मोरबाळे, आकाश शेवाळे, अमोल अनुसे उपस्थित होते.