हलाल प्रमाणपत्र व्यवस्था बंद करा !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बेळगाव येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन
बेळगाव, २२ ऑक्टोबर (वार्ता.) – धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित हलाल प्रमाणपत्र व्यवस्था तात्काळ बंद करावे आणि असे प्रमाणपत्र देणार्या सर्व संस्थांचे अन्वेषण करण्यात यावे, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बेळगाव येथे २१ ऑक्टोबरला हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार मंजुनाथ जानकी यांनी निवेदन स्वीकारले.
या आंदोलनात ‘हमारा देश संघटने’चे श्री. व्यंकटेश शिंदे, श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. रवी कोकीतकर, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री मारुति सुतार, सदानंद मासेकर, संजय राजपूत, रविकुमार करलिंगनावर, विक्रम लाड, पारितोष पोद्दार, सौ. अक्काताई सुतार, सौ. मीलन पवार, हिंदु जनजागृती समितीचे श्री. हृषिकेश गुर्जर यांच्यासह विविध संघटनांचे ३० हून अधिक प्रतिनिधी-कार्यकर्ते उपस्थित होते.