(म्हणे) ‘हिंदूंचे कुठे धर्मांतर होत आहे ?’
असदुद्दीन ओवैसी यांची सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्या विधानावर फुकाची टीका
भाग्यनगर (तेलंगाणा) – रा.स्व. संघ म्हणतो की, भारतातील लोकसंख्या वाढत आहे. हिंदूंचे धर्मांतर होत आहे ? कुठे धर्मांतर होत आहे ? (लव्ह जिहादद्वारे हिंदु मुलींचे कोण धर्मांतर करत आहेत, हे ओवैसी यांना ठाऊक नाही का ? – संपादक) तुम्हाला इतकी भीती का वाटत आहे ? बांगलादेशी येत आहेत म्हणजे सीमा सुरक्षा दल बिर्याणी खाऊन झोपत आहे का ? सीमेवर ते काय करत आहे ?, अशी फुकाची टीका एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केली. ते संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना एका कार्यक्रमात बोलत होते. होसबळे यांनी भारताच्या लोकसंख्या वाढीमागे बांगलादेशी घुसखोरांचाही सहभाग असल्याचे म्हटले होते.
#BreakingNow: जनसंख्या पर #RSS के बयान पर AIMIM चीफ ओवैसी का #BSF पर विवादित बयान, कहा- ‘BSF बिरयानी खाकर सो रही है क्या’@AnchorAnurag #AIMIM #AsaduddinOwaisi pic.twitter.com/SMXTEkxDws
— Times Now Navbharat (@TNNavbharat) October 22, 2022
ओवैसी पुढे म्हणाले की, ते म्हणतात, बांगलादेशची अर्थव्यवस्था भारतापेक्षा चांगली आहे. तेथील सकल राष्ट्रीय उत्पन्न चांगले आहे. भारतापेक्षा अधिक रोजगार तेथे आहेत, तर बांगलादेशी तेथून भारतात का येतील ?, असा प्रश्नही त्यांनी विचारला. (जर बांगलादेशची आर्थिक स्थिती भारतापेक्षा चांगली आहे, तर येथील आवैसी यांचे घुसखोर बांगलादेशी धर्मबांधव बांगलादेशात का जात नाहीत ?, असा प्रश्न कुणी विचारला, तर ओवैसी उत्तर देतील का ?- संपादक)