अलवर (राजस्थान) येथे मुलगा-सुनेवर ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी आई-वडील बनवत आहेत दबाव !
देवतांच्या मूर्ती तोडल्या, पूजा केल्यास करतात मारहाण !
अलवर (राजस्थान) – येथे एका हिंदु पती-पत्नीवर पतीचे आई-वडील ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करण्याचा दबाव बनवत आहेत. पीडित दांपत्य सोनू आणि रजनी यांना त्यांच्यामुळे एवढा त्रास होत आहे की, शेवटी त्यांनी आई-वडिलांच्या विरोधात पोलिसात तक्रार प्रविष्ट केली आहे. त्यांनी तक्रारीत म्हटले आहे, ‘आमच्या आई-वडिलांनी घरातील देवतांच्या मूर्ती तोडल्या आहेत, तसेच त्यांची चित्रेही फाडली आहेत. ते आमच्यावर सातत्याने धर्मांतर करण्याचा दबाव बनवत असतात.’ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद करून अन्वेषण चालू केले आहे.
१. या दांपत्याने म्हटले आहे की, आमचे आई-वडील आणि कुटुंबातील काही सदस्य यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे. जेव्हा आम्ही हिंदु देवतांची पूजा करतो, तेव्हा आई-वडील त्यास विरोध करतात. आमचे आई-वडील आम्हाला सारखे म्हणत असतात की, हिंदु धर्मातील प्रथा-परंपरा यांमध्ये काही अर्थ नाही.
२. आम्हाला जीवनभर हिंदु धर्मातच रहाण्याची इच्छा असल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. ‘आमच्या जीविताला धोका आहे. आम्हाला पोलिसांकडून संरक्षण मिळावे’, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
Couple alleges forced religious conversion in Rajasthan’s Alwar, police initiate probe
Read @ANI Story | https://t.co/HN3Jmts9FK#Rajasthan #alwar #policeprobe pic.twitter.com/cWKwq0HQRA
— ANI Digital (@ani_digital) October 20, 2022
३. तक्रार करण्यासाठी पीडित दांपत्याने बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद यांचे साहाय्य घेतले.
४. या प्रकरणी पोलीस अधीक्षक तेजस्विनी गौतम यांचे म्हणणे आहे की, प्रथमदर्शनी हे प्रकरण कौटुंबिक स्तरावरील आहे, असे दिसते. अन्वेषण करून योग्य कारवाई करण्यात येईल.
संपादकीय भूमिका
|