‘विकीपीडिया’वरील आयुर्वेदाच्या विरोधातील लेखांविषयीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली !
याचिकाकर्ते लेख स्वतःच संपादित करू शकतात ! – सर्वोच्च न्यायालय
नवी देहली – आयुर्वेद औषध निर्मात्यांनी विकीपीडिया संकेतस्थळावर प्रकाशित आयुर्वेदाच्या संदर्भातील लेखांच्या विरोधात प्रविष्ट केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. याचिकेत म्हटले होते, ‘या संकेतस्थळवरील लेखांद्वारे आयुर्वेदाला अपकीर्त करण्यात येत आहे.’ यावर न्यायालयाने याचिका फेटाळतांना म्हटले, ‘तुम्ही स्वतः ते लेख संपादित करू शकता, तर यात अडचण काय आहे ? जर तुम्हाला वाटते, तर तुम्ही दुसर्या कायदेशीर पर्यायांचा वापर करू शकता. यात आम्हाला काही अडचण नाही.’