डोंबिवली येथे महानगरपालिकेच्या निष्क्रीय कारभाराच्या विरोधात नागरिकांचे आंदोलन !
ठाणे, २१ ऑक्टोबर (वार्ता.) – ‘उठ, डोंबिवली जागी हो, हक्कासाठी सिद्ध हो’, अशा घोषणा देत डोंबिवली येथील नागरिकांनी २० ऑक्टोबरच्या रात्री फडके रस्त्यावरील आप्पा दातार चौक येथे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निष्क्रीय कारभाराच्या विरोधात आंदोलन केले. येथील आंदोलनात विविध भागांतील नागरिक सहभागी झाले होते. काही नागरिकांनी आंदोलनात सहभागी न होता घरातील आणि व्यापार्यांनी दुकानातील विजेचे दिवे रात्री ८ ते ८.०५ या वेळेत बंद करून निषेध नोंदवला. या आंदोलनात २०० हून अधिक नागरिक सहभागी झाले होते. शहरातील दुरवस्था झालेले रस्ते, खड्डे, वाहतूककोंडी आणि इतर नागरी समस्यांनी येथील नागरिक त्रस्त झाले आहेत.
संपादकीय भूमिकानागरिकांवर आंदोलनाची वेळ येणे, हे महानगरपालिका प्रशासनाला लज्जास्पदच ! महापालिकेतील कर्तव्यचुकार अधिकार्यांना बडतर्फच करायला हवे ! |