दौंड (पुणे) येथे ३ धर्मांधांसह अन्य ५ जणांवर गुन्हा नोंद !
९ जनावरांची अवैध वाहतूक केल्याचे प्रकरण
कुरकुंभ (जिल्हा पुणे) – येथील दौंड तालुक्यातील खडकी येथे पठाणवस्तीवर जाणार्या रस्त्यावर अवैधरित्या वाहनांमधून ९ जनावरे विनापरवाना, चार्यापाणीविना घेऊन जात असल्याचे पांडुरंग मेरगळ यांच्या लक्षात आले. या प्रकरणी पोलिसांनी सोहेल पठाण, हमीद पठाण, वसीम पठाण, लक्ष्मण भिसे या ४ परिचित, तर ४ अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी पांडुरंग मेरगळ यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
संपादकीय भूमिकागोवंशहत्या बंदी कायदा अस्तित्वात येऊनही गोवंशियांची अवैध वाहतूक होते, हे लज्जास्पद आहे ! या कायद्याला धाब्यावर बसवणार्यांना कठोर शिक्षा झाली, तरच असे प्रकार थांबतील ! |