ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयात थुंकणार्या रिक्शाचालकावर दंडात्मक कारवाई !
ठाणे, २१ ऑक्टोबर (वार्ता.) – ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी शहर सौंदर्यीकरण आणि स्वच्छता यांना विशेष महत्त्व देत प्रभाग समितीनिहाय ९० हून अधिक ठिकाणे कचरामुक्त केली आहेत. सार्वजनिक ठिकाणी कुणीही थुंकू नये, यासाठी पथके सिद्ध करून थुंकणार्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई चालू केली. २० ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी महानगरपालिकेचे आयुक्त मुख्यालयातून जात असतांना महापौर दालनाबाहेरील हिरवळीवर एक रिक्शाचालक थुंकला. ‘यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही’, असे सांगत आयुक्तांनी त्याला १५० रुपयांचा दंड आकारला आहे.
संपादकीय भूमिकारस्त्यावर ‘थुंकू नये’, हे सांगावे लागते, हा स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांमध्ये सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचाच परिणाम ! |