पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे क्रांतीवीर वसंत बाबाजी बडवे यांची ३७ वी पुण्यतिथी साजरी !
पंढरपूर (जिल्हा सोलापूर), २१ ऑक्टोबर (वार्ता.) – येथील सशक्त क्रांतीकारक, गोवामुक्तीवीर, समाजसुधारक, हिंदु महासभेचे क्रांतीवीर वसंतदादा बडवे यांची ३७ वी पुण्यतिथी १९ ऑक्टोबर या दिवशी साजरी करण्यात आली. रुक्मिणी पटांगणातील क्रांतीवीर वसंतदादा बडवे यांच्या अर्धपुतळ्याचे पूजन आणि अभिवादन सभा घेण्यात आली. पंढरपूर नगर परिषद, हिंदु महासभा आणि क्रांतीवीर वसंतदादा बडवे ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. सूत्रसंचालन विवेक बेणारे यांनी केले, तर स्वागत श्री. बाळासाहेब डिंगरे यांनी केले.
१. या वेळी हिंदु महासभेचे नेते श्री. अभयसिंह इचगावकर, पत्रकार महेश खिस्ते, मनसेचे राज्यनेते दिलीपराव धोत्रे, ह.भ.प. रामकृष्ण वीर महाराज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पंढरपूर जिल्हा संघचालक डॉ. रमेश सिद, विश्व हिंदु परिषदेचे श्री. रवींद्र साळी (सर) यांनी आपले विचार मांडले.
२. कार्यक्रमाचे अध्यक्ष वारकरी संत पाचलेगावकर महाराज यांचे अनुयायी ह.भ.प. दीपक महाराज सरनाईक म्हणाले, ‘‘कै. दादांसारख्या महापुरुषांचा आदर्श घेऊन हिंदु संस्कृती दैदिप्यमान व्हायला हवी. हिंदु राष्ट्र अखिल विश्वात गौरवाचे स्थान मिळवेल.’’ कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने करण्यात आली.
३. क्रांतीवीर वसंतदादा बडवे ट्रस्टच्या वतीने श्री. सौरभ थिटे यांनी यापूर्वीच्या ‘क्रांतीवीर वसंतदादा बडवे हिंदुत्व शौर्य’ पुरस्काराची माहिती देऊन ‘यंदाचा पुरस्कार थोर अभिनेते ‘शरद पोंक्षे’ यांना ९ नोव्हेंबर या दिवशी प्रदान करण्यात येणार आहे’, असे घोषित केले.