त्रेतायुगापासून दिवाळी सणाला प्रारंभ झाला ! – कु. कृतिका खत्री, प्रवक्त्या, सनातन संस्था
देहली – ‘दीपावली’ हा शब्द ‘दीप’ आणि ‘आवली (ओळ)’ या शब्दांनी बनला आहे. त्याचा अर्थ दिव्यांची ओळ असा आहे. त्रेतायुगात १४ वर्षांचा वनवास संपवून प्रभु श्रीराम अयोध्येला परतले. त्या वेळी अयोध्यवासियांनी दीपोत्सव साजरा केला होता. तेव्हापासून दीपावली हा सण चालू झाला आहे.
आपल्या घरात नेहमी लक्ष्मीचा वास आणि ज्ञानाचा प्रकाश रहावा, यासाठी लोकांनी सण आनंदाने आणि शास्त्रीय पद्धतीने केले पाहिजेत, असे प्रतिपादन देहली येथील सनातन संस्थेच्या प्रवक्त्या कु. कृतिका खत्री यांनी केले. ‘संस्कृती संस्कार’च्या वतीने दिवाळीनिमित्त नुकतेच ‘ऑनलाईन’ चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रामध्ये कु. कृतिका खत्री यांनी सहभाग घेतला होता.