दीपावलीनिमित्त पुढील वर्षापासून न्यूयॉर्कच्या शाळांना सुट्टी मिळणार !
न्यूयॉर्क (अमेरिका) – येथे दीपावलीनिमित्त सरकारी शाळांमध्ये पुढील वर्षापासून सुट्टी देण्यात येणार आहे, अशी घोषणा न्यूयॉर्कचे महापौर एरिक अॅडम्स यांनी केली आहे. न्यूयॉर्क विधानसभेच्या सदस्य जेनिफर राजकुमार यांनी दीपावलीला सणाच्या रूपामध्ये मान्यता देण्याचे विधेयक सादर केले होते. याचे महापौर अॅडम्स आणि न्यूयॉर्क शहरातील शाळांचे अध्यक्ष डेविड बैंक्स यांनी समर्थन केले होते. जून मासामध्ये प्रतिवर्षी वर्धापनदिनाच्या निमित्ताने मिळण्यात येणारी सुट्टी रहित करून दीपावलीची सुटी देण्यात येणार आहे.
Diwali, the Hindu celebration known as the “Festival of Lights,” will be a public school holiday in NYC starting next year. https://t.co/twSksq1wtY
— CNN (@CNN) October 20, 2022
१. महापौर अॅडम्स म्हणाले की, दीपावलीनिमित्त आम्ही मुलांना प्रोत्साहित करणार आहोत. यावर आम्ही चर्चा करून मुलांना सांगू की, ज्या प्रमाणे दीपावलीमध्ये दिवे लावून प्रकाश पसरवला जातो, तसा आपल्या आताही प्रकाश निर्माण करून अंधकार दूर केला पाहिजे.
२. या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरमध्ये दीपावलीचा सण साजरा करण्यास चालू झाले आहे. दुसरीकडे अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २१ ऑक्टोबर या दिवशी त्यांच्या निवासस्थानी दीपावली साजरी केली.